चैत्र पौर्णिमा -०५ एप्रिल २०१५

शनिवार दिनांक ०४ एप्रिल २०१५ रोजी चैत्र पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यामुळे, पौर्णिमेचा उत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन दुसर्या दिवशी म्हणजेच रविवारी दिनांक ०५ एप्रिल २०१५ रोजी करण्यात आले.

लोक सर्वसाधारणपणे सत्यनारायणाची पूजा घालतात. परंतु श्री दाविद् महाराज प्रत्यक्ष दत्त स्वरूप असल्यामुळे त्या दिवशी "सत्य दत्त" पूजा घालण्यात आली.

कोल्हापूरचे दाविद् महाराजांचे परम भक्त डॉ. लाड यांच्या नातवाचा, चिरंजीव प्रणव याचा ( जो श्री महाराजांच्या आशीर्वादानेच झाला आहे) वाढदिवस तसेच ईस्टर व हनुमान जयंतीचे निमित्त साधून डॉ. लाड यानी "सत्य दत्त" पूजा व महाप्रसादाचे आयोजन केले होते. श्री नक्श रमेश जैन यानी सुद्धा महाप्रसादासाठी हातभार लावला