ख्रिसमस - २५/१२/२०१४
श्री महाराज देहात असताना खूपशी भक्त मंडळी श्री महाराजाना ख्रिसमसच्या शुभेच्छा द्यायला येत असत. आता श्री महाराज देहात नाहीत, तरीही ते चैतन्य रुपात आहेत अशी भावना घेऊन दिनांक २४/१२/२०१४ रोजी रात्री १२ वाजता काही भक्त मंडळी दाविद् महाराजांच्या समाधी स्थळावर जमली आणि तिथे केक कापून क्रिस्मस सण साजरा केला. दुसर्या दिवशी म्हणजे दिनांक २५/१२/२०१४ रोजी खूपशी भक्त मंडळी महाराजांच्या समाधी स्थळावर प्रार्थना आणि क्रिस्मसच्या शुभेच्छा द्यायला जमली तिथे पुन्हा एकदा केक कापून उपस्थित सर्व भक्ताना प्रसाद वाटप केले गेले. समाधीच्या भोवती सर्वत्र मेणबत्त्या लावल्या. सर्व समाधी मंदीर महाराजांच्या पवित्र प्रकाशाने भारून गेल्यागत वातावरण झाले. सायंकाळी आरती आणि जप करून भक्त मंडळीनि सर्व मंदीर पवित्र वातावरणाने भरून टाकले.
दिनांक ०१/०१/२०१५ श्री महाराजांचा जन्मदिवस. त्या दिवशी बरीचशी भक्त मंडळी पुन्हा एकदा एकत्र जमली. सकाळी श्री महाराजांच्या समाधीवर अभिषेक केला. तसेच जिलेबी आणून सर्वा उपस्थित भक्ताना प्रसादरुपात वाटप केले.