तृतीय पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम सोहळा

परमपूज्य श्री दाविद महाराजांचा तृतीय पुण्यतिथी सोहळा मंगळवार दि . २८ जून २०१६ ते बुधवार दि . २९ जून २०१६ या कालावधीत संपन्न झाला . मंगळवार दुपारनंतर बाहेरगावी भक्त मंडळींची लगबग सुरू झाली .

२८ जून २०१६ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री दाविद महाराज भक्तीरस या विषयावर प्रवचन झाले . ह. भ. प. श्री दिपक केळकर महाराजांचे रात्री ८ वाजता भजन झाले .

त्यानंतर रात्री १० ते १२:३० पर्यंत कुमठे येथील ओम श्री कचरनाथ सेवा भजनी मंडळातर्फे सुश्राव्य भजन झाले .

तदनंतर बुधवारी सकाळी दि . २९ जून रोजी परमपूज्य चैतन्य भारती महाराज देखरेखी खाली सकाळी ७ वाजता सदगुरुंच्या समाधीला अभिषेक व पुष्पवृष्टी करण्यात आली .

नंतर प. पू. चैतन्य भारती महाराजांचे भक्तीरस प्रवचन ऐकून भक्तगण मुग्ध झाले .

सकाळी १० वाजता श्री सदगुरुंची पालखी संपूर्ण माधवनगरात वाजतगाजत निघाली आणि परत १२ वाजता समाधी मंदिरात आली. त्यानंतर सर्व उपस्थित संताचा शीर केळकर महाराजांच्या हस्ते शाल - श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.

परमपूज्य दाविद महाराजांचे भक्त श्री जग्गाराजू यांनी प्रसाद म्हणून पेनचे वाटप केले. पेनचे उदघाट्न श्री केळकर महाराजांच्या हस्ते संपन्न झाले.

दाविद महाराजांचे रत्नागिरीचे भक्त श्री सिध्दराज सावंत यांनी रत्नागिरी चौफेर हे संपूर्ण पाक्षिक खास दाविद महाराजांच्या आठवणी आणि भक्तांच्या अनुभवाने परिपूर्ण असे छापले आणि सर्व संतमंडळींच्या हस्ते त्याचे भक्तांना वाटप केले. श्री सिध्दराज सावंत तसेच दाविद महाराजांचे भक्त श्री पवार (रत्नागिरी) यांनी त्यांचे व श्री दाविद महाराजांचे अनुभव कथन केले .

त्यानंतर श्री केळकर महाराजांनी भक्तिपूर्ण अभंग म्हणून भक्तांना भक्तिरसात न्हाऊ घातले . १२ : ४५ च्यापुढे महाप्रसादाचे वाटप झाले .

अतिशय शिस्तबद्ध असा कार्यक्रम दुपारी ४ वाजेपर्यंत संपन्न झाला .

सर्व भक्त मंडळींनी जवळपास आठवडाभर अतिशय मेहनत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला . श्री दाविद महाराजांची अशीच अनंत कृपा त्यांचा भक्तांवर राहो हेच मागणे दाविद महाराजांच्या चरणी अर्पण करून सर्व भक्त कृतार्थ मानाने आपआपल्या गावी रवाना झाले .

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री दाविद महाराजांचे आशीर्वाद घेऊन पप्पू डोंगरे यांच्या देखरेखीखाली सर्वश्री शहा, टेके साहेब , गवळी ( टेलर ), नेताजी साळुंखे, प्रकाश किरवे , संजय पाटील , उदय पाटिल, श्री पाटिल (वैशाली ज्वेलर्स ) तसेच माधवनगर पोलिसस्टेशन चे सर्व पोलीस बंधू व भगिनी आणि असंख्य अनामिक भक्तगण या सर्वांची खूप मदत झाली .

|| ॐ दाविद… हरी दाविद… ॐ दाविद… गुरू दाविद ||