श्री दाविद् महाराजांची प्रथम पुण्यतिथी
दिनांक २१ जून रोजी माधवनगर, सांगली येथे श्री दाविद् महाराजांची प्रथम पुण्यतिथी, तिथी नुसार साजरी केली.
शुक्रवारी दि.२०च्या दुपारी हळदी कुंकू समारंभ माता भगिनींच्यासळसळत्या उत्साहात संपन्न झाला.
दुपारपासून धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाली. दुपारी ४ ते ५.३० पर्यंत द्न्यानेश्वरीच्या ९व्या अध्यायाचे पारायण ह.भ.प. आंदोजी महाराजांच्यामार्गदर्शनाखाली संपन्न झाले. नंतर भजन कीर्तन कार्यक्रम ७.०० वाजेपर्यंत संपन्न झाले. नंतर रात्री ९.०० ते ११ वाजेपर्यंत भजन सेवा झाली.
शनिवारी २१ जून रोजी सकाळी प.पु चैतन्यभारतीमहाराज,श्री केळकर (अण्णा) महाराज, श्री गुरुनाथ कोटनीस महाराज,आनंदगिरी महाराजयांच्या पवित्र हस्ते, तसेच इतर साधू संतांच्या आणि भक्तांच्याउपस्थितीत, पवित्रमंत्र उद्घोषात ६.३० वाजता श्री महाराजांच्या समाधीवर,पंचामृताचा अभिषेक सोहळासंपन्न झाला.त्यानंतर समाधीवर पुष्प वृष्टी सोहळाझाला.सभामंडपातील संपूर्ण वातावरण श्री दाविड महाराजांच्या पवित्र स्मृतीने भरून गेले होते.
मंडपा बाहेर वरूण राजाचीकृपावृष्टीसुरु झाली आणि मंडपाच्या आत प.पु आनंदगिरी महाराज, प.पु. केळकर (अण्णा) महाराज यांची रसाळ अध्यात्मिक प्रवचने उपस्थित भक्ताना भक्तीच्या रसात चिंबभिजवून गेली. ह.भ.प. प.पु. केळकर महाराजांच्याशुभ हस्ते श्री दाविद् महाराजांच्या वेबसाईटचे उद्घाटन झाले.वेबसाईटवर श्री महाराजांचे संक्षिप्त चरित्रवाचून आणि फोटो बघून सर्व उपस्थित भक्तांचे डोळे श्री महाराजांच्या आठवणीने भरून आले.बर्याच भक्ताना आपल्या अश्रूंचा बंध थोपविता आला नाही.
उपस्थित सर्व साधू संतांचे मा. खा. श्री संजय काका पाटील, मा. शिवाजी (पप्पू)डोंगरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन श्री नेताजी साळुंखे यानी केले.दूपारी १२ वाजे पासून महाप्रसाद सुरु झाला.जवळपास १५०० लोकानी महाप्रसादाचा लाभ घेतला.