महाराज साक्षात दत्तअवतारी असल्याची साक्ष
फार पुर्वी दाविद् महाराज जुन्या रेल्वे स्टेशन वर रहात. तिथे त्याना भेटायला बरेच लोक येत. आम्ही सुद्धा त्यांच्या दर्शनाला जात असू.आम्ही स्वत्: त्याना भर पावसात एका पायावर बराच वेळ उभे राहिलेले पाहिले आहे. आमच्या घरी एकनाथी भागवताचे पारायण असे. त्यावेळी महाराजकुठूनही हमखास आमच्या घरी येत आणि खुर्चीत बसून असत.रात्री प्रसाद घेऊनच जात.एके दिवशी महाराजानी विचारले की मी येथे थांबू का? तेव्हा आम्ही हो म्हंटले. त्यानंतर जवळपास ३ वर्ष महाराज आमच्या घरी वास्तव्याला होते. माझा मोठा मुलगा अथर्व याला महाराज मांडीवर खेळवत असत.महाराज एकदा मधेच पाली बस स्टॅंडवर निघून गेले आणि जवळपास तीन महिन्यानंतर रात्री दोन वाजता आमच्या घरी परत आले.आल्या आल्या त्यानी विचारले की माझी मूलं कुठे आहेत. तेव्हा आम्ही म्हंटले की एकच मुलगा आहे. त्यावेळी महाराज म्हणाले की खोटे बोलू नका.दोघे आहेत मला माहित आहे. त्यावेळी माझा धाकटा मुलगा अमोघ जेमतेम दोन महिन्यांचा होता.अमोघचा पाळणा सुद्धा महाराजानी जोजावला होता. आमच्या दोन्ही मुलाना आम्ही ओरडलेले सुद्धा त्याना खपत नसे.एकदा माझ्या मुलाने महाराजांच्या पाठीवर उसाच्या दंडयाने प्रहार केला, म्हणून माझ्या बायकोने मुलाला मारले. तेव्हा महाराज माझ्या बायकोलाच ओरडले की माझ्या मुलाना का मारलास?त्यांची आमच्या मुलांवर अगदी पोटच्या मुलांप्रमाणे माया केली. पुर्वी माझे वडील वाडीला जात असत. त्यानंतर सोलापुरला ट्रान्स्फर झाल्यावर गाणागपूरला जात असत. म्हणजे दत्त भक्ती करत असत. रेटायरमेंट नंतर त्यानी माळ घातली आणि आळंदिला जाउ लागले. तेव्हा महाराज म्हणाले पुर्वी तू माझ्याकडे येत असे आता माळ का घालतोस. मी बर्याच वेळा वाडीला जायचो. तेव्हा महाराज म्हणत की मी इथे असताना वाडीला जायची काय गरज आहे? ही घटना महाराज साक्षात दत्तअवतारी असल्याची साक्ष आहे.
0 Comments