तुमच्यामागे मोठा सर्प आहे.
तुमच्यामागे मोठा सर्प आहे. त्याच्या पासून सांभाळा. असे श्री दाविद् महाराज दि. २० जुलै २०१२ रोजी सांगली सिविल हॉस्पिटल मध्ये असताना मला अचानक बोलले. मी विचारले की मी काय करू? श्री म. म्हणाले की AVOID इट, त्याला टाळा. मला कळेना नक्की काय प्रॉब्लेम आहे. अचानक मला आठवले की दिल्ली येथील एक अवलिया मला भेटले होते आणि त्यानी मला फारशी भाषेतील एक मंत्र दिला होता. त्या अवलियानी सांगितले होते की तो मंत्र इतका प्रभावी आहे , की या जगात जी वस्तू हवी ती या मंत्राच्या वापराने मिळू शकते. आणि योगायोग असा की श्री,म.ची ऑपरेशनची भयंकर जखम बघून ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून तो मंत्र मी मनातल्या मनात म्हंटला होता. थोडया वेळाने मी विचारले की तुम्ही त्या अवलिया किंवा मंत्राबद्दल बोलत आहात का? तेव्हा ते जोरात ऊसळून म्हणाले की होय मी त्याच्या बद्दलच बोलतोय. श्री म. म्हणाले की असले घाण काही म्हणू नका. ही सर्व AVOID करा. थोडक्यात श्री म. भक्ताच्या मनातील सर्व विचार जाणू शकत होते आणि त्याना योग्य मार्गावर आणण्याचे काम करीत.मी अक्षरष: अवाक झालो. कारण ती जखम खूपच भयंकर होती आणि ते भोग भोगण्याचे सामर्थ्य केवळ विदेही अवस्थेत असलेल्या अशा संतांकडूनच शक्य आहे. आजही तो प्रसन्ग आठविला की डोळे भरून येतात. धन्य ती दाविद् माऊली.
0 Comments