Recent Members

मला " दाविद् दाविद्" असे ऐकू येतय.


by : Madhuvanti Phatak on 08/07/2014

श्री दाविद् महाराज कोल्हापूरला डॉ. लाड यांच्या हॉस्पिटल मध्ये नवेंबर २०१२ ला असतानाच, मी मुंबई वरून त्यांच्या दर्शनाला गेले होते. श्री महाराजांच्या समोर बसले असताना मी मनातच " दाविद्, दाविद् " असे श्रीमहाराजांचे नामस्मरण करीत होते. अचानक महाराज खुर्चीवरून पुढे वाकून मला म्हणाले की मला " दाविद् दाविद्" असे ऐकू येतय. एक क्षण मला कळलेच नाही. नंतर मला एकदम लहानमुलासारखा आनंद झाला. की महाराजना मी काय जप करते आहे, हे त्यांच्या पर्यंत पोचत होते. आणि हे त्यानी मला दाखवून दिले. माझे डोळे एकदम भरून आले, मला त्यानी नामस्मरण करण्यासाठी जणू आशीर्वादच दिला.आजही ती घटना आठवली की श्री श्रीमहाराजांना नमस्कार करण्यासाठी हात नकळत जोडले जातात.


0 Comments